केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ खान उद्या मोहोळमध्ये, प्रचंड पोलीस बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr aarif Khan and Dr Chandrakant Pandav

केरळचे राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान हे गुरुवार 5 मे रोजी मोहोळ येथे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ खान उद्या मोहोळमध्ये, प्रचंड पोलीस बंदोबस्त

मोहोळ - केरळचे राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान (Dr. Aarif Mohammad Khan) हे गुरुवार 5 मे रोजी मोहोळ (Mohol) येथे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त (Police Bandobast) तैनात करण्यात आला आहे. 111 पोलीस, 40 होमगार्ड, 13 अधिकारी, 25 वॉकीटॉकी संच, एच. ई. एच. एच. एम. डी. 5, डी. एफ. एम. डी. 2, श्वान पथक, एक स्ट्रायकिंग फोर्स, आदींचा समावेश असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.

मोहोळ चे सुपुत्र ए. आय. एम. एस. चे अधिष्ठाता, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक, आयोडीन मॅन डॉ. चंद्रकांत पांडव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार राज्यपाल डॉ. अरिफ खान यांच्या हस्ते मोहोळ येथे संपन्न होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा धन्वंतरी पुरस्कार डॉ. फहीम गोलीवाले, डॉ. नितीन तोष्णीवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री दत्ता भरणे, खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, संस्कृतिक मंत्री अमित देशमुख एम. आय. टी. चे संस्थापक विश्वनाथ कराड माजी आमदार राजन पाटील, जि. प. सदस्य उमेश पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कुलगुरू मृणालिनी फडणवीस, एम. आय. टी. चे अध्यक्ष राहुल कराड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड, बाबासाहेब क्षीरसागर, प्रतापसिंह गरड, डॉ कौशिक गायकवाड, प्रवीणसिह गरड आदीसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राज्यपाल डॉ. खान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. राज्यपाल येण्याच्या ठिकाणाची उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, परीक्षाविधिन पोलीस अधीक्षक श्री कार्तिक, पोलीस निरीक्षक मोतीराम गुंजवटे, तहसीलदार प्रशांत बेडसे, नगरपरिषदेचे प्रशासक योगेश डोके, राष्ट्रीय महामार्गाचे अमित पांडे आदीसह अन्य अधिकाऱ्यानी पाहणी केली. या कार्यक्रमासाठी दहा सदस्यीय नागरी सत्कार समिती व सहा सदस्यीय आयोजन समिती गठित केली आहे.

Web Title: Governor Of Kerala Dr Arif Khan In Mohol Tomorrow Huge Police Security

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top