Solapur News : पर्यावरण संतुलनासाठी पुरवठा विभाग लावणार 24,106 झाडे

ग्रामीण भागातील कुटुंबाच्या घराच्या अंगणात, परस बागेत अथवा घराजवळ किमान एक झाड लावता येईल.
govt campaign One Family One Tree plant 24106 trees for environmental balance solapur
govt campaign One Family One Tree plant 24106 trees for environmental balance solapuresakal

मंगळवेढा : एक कुटुंब एक झाड"या मोहिमेत अंतर्गत शासन, स्वयंसेवी संस्था, रास्तभाव दुकानदार, दक्षता समित्या, बचत गट, रास्तभाव दुकानदार संघटना, पुरवठा विभागामार्फत तालुक्यात 15 ऑगस्ट रोजी 24 हजार 106 रोपांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून "वन नेशन वन रेशनकार्ड" या घोषणेच्या धर्तीवर "एक कुटूंब एक झाड" ही मोहिम राबविण्याचा संकल्प पुरवठा विभागाने धान्य वितरणाचे पवित्र काम करत असताना पर्यावरण संवर्धनामध्ये खारीचा वाटा असावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबासाठी किमान एक झाड लावण्याचा संकल्प केला.

ग्रामीण भागातील कुटुंबाच्या घराच्या अंगणात, परस बागेत अथवा घराजवळ किमान एक झाड लावता येईल. पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे यामध्ये चिंच, जांभूळ, लिंब, उंबर, वड, पिंपळ अथवा बांबू ई.) आदीची रोपे शासकीय रोपवाटिका स्वयंसेवी संस्था तसेच कंपनीच्या सी. एस. आर. मधून रोपे उपलब्ध करण्यात येणार आहे.

govt campaign One Family One Tree plant 24106 trees for environmental balance solapur
Solapur : 'याचा अर्थ मी काय करणार नाही असं समजू नका'; आरोग्य अधिकाऱ्याला आ.समाधान आवताडेंचा इशारा

रास्तभाव दुकानदार यांचे मार्फत त्यांचेकडील लाभार्थी कुटुंबाना रास्तभाव दुकानदारांनी प्रबोधन करून "वृक्ष आपल्या दारी पर्यावरण रक्षण घरोघरी" या उक्तीप्रमाणे - वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे.

१५ ऑगस्ट २०२३ रोजी या झाडांची सुनिश्चित ठिकाणी लागवड करून त्याची देखभालीची जबाबदारी संबंधीत लाभार्थी कुटुंबाना देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने एका वृक्षाची जबाबदारी एका कुटुंबास दिल्यास वैयक्तिक लक्ष देण्यामुळे झाडे चांगली जोपासली जातील.

govt campaign One Family One Tree plant 24106 trees for environmental balance solapur
Solapur Crime : जीवे मारण्याची धमकी देऊन मित्राकडूनच उकळले दहा लाख

वृक्ष चळवळीची मोहीम व्यापक होऊन निसर्ग संवर्धनाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास निश्चित मदत होईल. वृक्ष लागवड मोहीम तहसीलदार मदन जाधव पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील शिवाजी भोसले यांच्यासह पुरवठा विभागाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com