

Government Order Clears Use of CSR Funds for Solar Panels on Rural Housing
Sakal
सोलापूर : राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींना घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यावर छतावर सौरसंच बसविण्यासाठी सीएसआर (कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) फंडातून किंवा शासनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने तसा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कार्यवाही करावी लागणार आहे.\