सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य सरकारने ग्रामविकास विभागाकडील १५ लाखांच्या आतील कामे ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यावर म्हणणे सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाला दिले आहेत.