

Solapur Witnesses Divine Wedding of Shiv-Parvati with Traditional Rituals
Sakal
सोलापूर : सोलापुरातील जुने विडी घरकुल परिसर मंगळवारी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने आणि भक्तीच्या सुगंधाने न्हाऊन निघाला. निमित्त होते, शंभो मारुती मंदिर परिसरात आयोजित केलेल्या भगवान शिव-पार्वती यांच्या दिव्य कल्याणोत्सव सोहळ्याचे. या सोहळ्यामुळे विडी घरकुल परिसरात जणू साक्षात कैलास अवतरल्याचा भास होत होता. पाच हजार शिवभक्तांच्या साक्षीने पवित्र अशा पंदिरीमध्ये भगवान शिव व माता पार्वती यांच्यावर अक्षता वाहून पवित्र कल्याणोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.