

Cultural Grandeur Marks Yogdand and Kumbhar Community Wedding Ritual
sakal
सोलापूर: दुपारी बरोबर १ वाजून २७ मिनिटांनी सोलापूर अक्षरशः थांबले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्याचे क्षण अनुभवण्यासाठी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ‘सत्यम्...सत्यम्...दीड्डम...दीड्डम...’च्या निनादात आणि ‘हर्र बोला हर्र’च्या गजरात लाखो हातांनी अक्षतांची उधळण करत साक्षात भक्तिच्या श्वेत सागरात बुडून गेला. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी प्रतीकात्मक विवाहाची १२ व्या शतकापासूनची परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पार पडली. या ऐतिहासिक व मंगल क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सोलापुरात भाविकांचा महासागर उसळला होता.