विठ्ठलमूर्ती झीज प्रकरणी पुरातत्व खात्याचा अहवाल आला; दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

मुर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागानं अहवाल सादर केला आहे.
vitthal rukmini
vitthal rukmini
Updated on

पंढपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मुर्तींची झीज होत असल्यानं ती रोखण्यासाठी पुरातत्व विभागानं अहवाल तयार केला आहे. या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला आहे. त्यानुसार आता गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्यात येणार असल्याचं सुत्रांकडून कळतंय. (granite will remove from Vitthal Rukmini Mandir of Pandharpur decision taken by temple committee)

vitthal rukmini
संभाजी राजे निवडणूक लढणार, नव्या संघटनेची घोषणा

मंदिराच्या गाभाऱ्यातील उष्णता आणि आर्द्रता वाढत असल्यानं विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मुर्तीची झीज होत होती. पण वारंवार सांगूनही मंदिर समिती यावर निर्णय घेत नव्हती, याबाबत नुकतीच पुरातत्व खात्यानं मंदिराला भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली. त्यानुसार मंदिरातील गाभाऱ्यात पूर्वी जी दगडांची रचना होती ती कायम ठेवण्यात येणार आहे. सध्या इथं ग्रॅनाईट लावल्यानं उष्णता वाढत होती म्हणून आता ग्रॅनाईट काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

vitthal rukmini
देश सोडू नका; श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानांना न्यायालयाचे आदेश

त्याचबरोबर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या अभिषेकाच्या वेळी मुर्तीवर दही, दूध, मध, साखर यांचा वापर केला जात असतो तर तो अतिशय मर्यादित स्वरुपात वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच मुर्तींना आंघोळ घालताना क्षारयुक्त पाण्याचा वापर टाळण्यासाठी केवळ मिनरल वॉटरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुक्मिणीच्या मुर्तीच्या पायांची झीज झाली असून ते पुन्हा बनवून घेण्यासाठी पुरातत्व विभाग मंदिराला भेट देणार आहे.

vitthal rukmini
गुडन्यूज! मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात

मंदिराचा गाभारा अतिशय लहान आहेत, त्यातच मोठ्या प्रमाणावर भाविक गाभाऱ्यात येत असतात. त्यामुळं इथंली उष्णता खूपच वाढते त्यामुळं पुरातत्व विभागानं सांगितलेलं तापमान कायम राखण्यासाठी ते मोजण्याचं उपकरणही इथं लावलं जाणार आहे. त्यामुळं मर्यादित भाविकांनाच एकावेळी दर्शनासाठी आत सोडलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com