

Raisin Import Row: Grape Growers Warn of Agitation if Probe Fails
sakal
सोलापूर: अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनचा बेदाणा देशात आयात करून भारतीय बेदाणा म्हणून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार द्राक्ष बागायतदार संघाने सांगलीत उघडकीस आणला आहे. अशाप्रकारे सुमारे पाच हजार टन बेदाणा भारतीय बाजारात आल्याचा संशय संघाने व्यक्त केला आहे. संघाच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या बेदाण्याची चौकशी सुरू झाली आहे. याप्रकरणी संघ आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.