पालकमंत्री भरणे म्हणाले, पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठी ठरवतील तो उमेदवार फायनल !

Pawar
Pawar
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे हे ठरवणार असून, ते जे निर्णय घेतील तो उमेदवार फायनल असेल. दिवंगत भारत भालके यांचे या मतदारसंघात फार मोठे काम असल्यामुळे तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी होण्यास अडचण निर्माण होणार नाही. शेवटी महाविकास आघाडीचे सरकार आहे, असा विश्‍वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. 

नगरपालिकेच्या वतीने शहरात केलेल्या बगीचा सुशोभीकरण, गॅस शवदाहिनी, उद्योग प्रशिक्षण इमारत, प्रस्तावित शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अभ्यासिका आदींसह विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री भरणे मंगळवेढा येथे आले होते. त्या वेळी साठेनगर येथील कामाची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. 

त्यांच्या समवेत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे लतीफ तांबोळी, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, प्रवीण खवतोडे, विजय खवतोडे, संकेत खटके, महिला जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, सोमनाथ माळी, सचिन शिंदे, भागीरथी नागणे, अनिल बोदाडे, चंद्रकांत पडवळे, राहुल सावंजी, बशीर बागवान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजम्मिल काझी, भारत बेदरे, ऍड. शिवानंद पाटील, बसवराज पाटील, गुलाब थोरबोले आदी उपस्थित होते. 

दिवंगत भारत भालके यांनी मंगळवेढा शहर विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माझ्याकडे अनेक वेळा मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यांनी मागणी केलेल्या सर्व प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाही. नगरपालिकेने विकासकामांच्या संदर्भात ज्या प्रस्तावांची मागणी केली आहे त्याला राज्य सरकारबरोबरच जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देणार आहे, असे आश्‍वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले. 

या वेळी नगराध्यक्षा अरुणा माळी व पक्षनेते अजित जगताप यांच्याकडून नगरपालिकेच्या वतीने कोणकोणत्या कामांचे प्रस्ताव दाखल केले आहेत त्याची माहिती जाणून घेतली. साठेनगर येथे पाहणी दरम्यान एका महिलेने मंजूर होणारी कामेही त्याच प्रभागात करावी, इतरत्र स्थलांतर करू नये, अशी मागणी केली. 

साठे नगरमधील महिला व तरुणांशी संवाद साधत सुरू असलेल्या कामांकडे लक्ष देऊन ही कामे चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाचे रुग्ण वाढण्याच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक तालुकानिहाय भेट देऊन तेथील अडचणी जाणून घेत असून, आवश्‍यकतेनुसार त्यांना निधी उपलब्ध करून देत आहोत, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com