नौटंकी कशाला करता, कृतिशील सहभाग नोंदवा ! पालकमंत्री भरणेंचा भाजप लोकप्रतिनिधींना टोला

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजप लोकप्रतिनिधींच्या आंदोलनावर प्रत्युत्तर दिले
Dattatraya Bharane
Dattatraya BharaneEsakal

सोलापूर : जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या कोरोनाने (Covid-19) थैमान घातले आहे. अशा जीवघेण्या काळात नौटंकी करू नका, कोरोनामुक्तीसाठी कृतिशील सहभाग नोंदवा. कृतिशील सहभाग नोंदवून लोकांच्या मदतीला धावून आलात तर तुम्ही ज्या पूनम गेटवर आंदोलनाला (Agitation) बसला होतात त्याच ठिकाणी मी तुमचा जाहीर सत्कार करेन, असा उपरोधिक टोला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी लावला आहे. (Guardian Minister Dattatraya Bharane responded to the agitation of BJP people's representatives)

सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार व खासदारांनी गुरुवारी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कोरोनाच्या संकटात सोलापूरवर अन्याय होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर पालकमंत्री भरणे यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.

Dattatraya Bharane
शहर-जिल्ह्यात 1625 नवे कोरोना बाधित ! 44 जणांचा मृत्यू

पालकमंत्री भरणे म्हणाले, एका पक्षात असूनही आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख या दोन देशमुखांचे सूत कधीच जुळले नाही. दोन बाजूला दोन तोंडे असलेले असे दोघे देशमुख आज सोलापूरकरांसाठी रस्त्यावर उतरल्याचा आनंदच आहे. खरे पाहता या दोघांकडेही मंत्रीपदे होती. आरोग्य आणि सहकार ही दोन महत्त्वपूर्ण खाती त्यांनी सांभाळली. परंतु सहकार तत्त्वावरील एक हॉस्पिटल त्यांच्या कार्यकाळात उभे राहिले नाही, अशी टीकाही पालकमंत्री भरणे यांनी केली.

Dattatraya Bharane
महाविकास आघाडी सरकार विरोधात सोलापूरच्या भाजप आमदार-खासदारांची घोषणाबाजी !

कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत महाविकास आघाडी सरकारने आरोग्य यंत्रणा कुठेच तोकडी पडू दिली नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशात मृतदेह नदीत फेकले जात आहेत. परंतु महाराष्ट्रात अशी भयंकर परिस्थिती नाही. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर नाचावे लागणाऱ्या नेत्यांना भाजपचे सरकार जिथे नाही, तिथे अशी नौटंकी करावीच लागत आहे. सोलापूरच्या स्थानिक पातळीवर हेच नाट्य सुरू झाले असून त्यात काही नवल नाही. अशा नौटंकीपेक्षा कोरोनाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन राजकारणाचे जोडे बाहेर ठेवले तर ते सोलापूरकरांच्या अधिक हिताचे ठरेल अशी अपेक्षा भरणे यांनी व्यक्त केली.

महास्वामींनी सोलापूरकरांवर उपकार करावेत

सुदैवाने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी देखील भगव्या कपड्यात या आंदोलनात अवतरले आहेत. आंदोलनाची हीच भूमिका, आक्रमकता त्यांनी दिल्ली दरबारी दाखवून सोलापूरसाठी व राज्यासाठी मोठ्या संख्येने कोरोना लस मागवून घेतली तर या खासदार महास्वामींचे सोलापूरकरांवर खूप उपकार होतील. ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आणि लस पुण्याला घेऊन जात असल्याचा आरोप सोलापूरची काही राजकीय मंडळी करीत आहेत. हा केवळ सोलापूर किंवा पुण्याचा प्रश्न नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. राज्यात भाजपची डाळ शिजली नाही म्हणून पक्षीय राजकारण खेळले जात असल्याचा आरोपही पालकमंत्री भरणे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com