'या' कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या आनंददायी प्रतिसादाने पालकमंत्री दत्तात्रय भरणे भारावले ! वाचा 

barshi palakmantri.png
barshi palakmantri.png

बार्शी (सोलापूर)ः जेवण चांगलं मिळतंय का...वेळेवर साफ-सफाई होते का...उपचार व्यवस्थित मिळतात का असे प्रश्‍न पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना रुग्णांना विचारले तेव्हा ...हो घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे...इथं चांगली काळजी घेतली जात आहे...अशी उत्तरे रुग्णांनी दिली. 

बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय पॉलिटेक्‍निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुग्णांशी असा संवाद साधला. 
पालकमंत्री भरणे यांनी रविवारी(ता. 26) सायंकाळी बार्शीतील कोविड केअर सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी रुग्णांकडून माहिती घेतली. आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. शासन आपल्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे. तुम्ही बरे होताय, काळजी करू नका. मनोधैर्य वाढवा, खचू नका, असेच हसत खेळत रहा, घाबरू नका अशा शब्दात भरणे यांनी रूग्णांना धीर दिला. 

बार्शीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालय वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे पॉलिटेक्‍निक कॉलेज याठिकाणी चार तर वैरागमध्ये श्री साई आयुर्वेदिक महाविद्यालयात कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी असणाऱ्या त्रुटींची त्वरित पूर्तता करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अंकित, तहसीलदार डी.एस.कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.शीतल बोपलकर आदी उपस्थित होते. 


वृक्षारोपण करण्याची रूग्णांची इच्छा 
आम्ही रूग्ण म्हणून याठिकाणी असलो तरी या महाविद्यालयातील कोविड सेंटरची आठवण म्हणून आम्हाला येथे वृक्ष लावायची आहेत. खड्डे खोदून तयार केले आहेत असे एका रूग्णाने सांगितले तेव्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या साठी त्वरित रोपे देण्यात येतील असे सांगितले. 

नागपंचमींला महिला रूग्णांचा फेर 
कोविड केअर सेंटरमध्ये मुले, मध्यमवयस्क महिला हे सोशल डिस्टन्स पाळून त्यांच्या आवडीचे खेळ खेळत आहेत. नागपंचमीला महिलांनी सेंटरमधील मैदानातच फेर धरल्याचे रूग्णांनी आवर्जुन सांगितले. 


लॉकडाउन तुमच्या आरोग्यासाठीच 
शासन आणि प्रशासनाला लॉकडाऊन करण्यात आनंद नाही. तालुक्‍यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्याला रूग्ण कमी करायचे आहेत. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि जीविताचा धोका टाळण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. प्रशासनाला सहकार्य करावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सुरक्षित अंतर ठेवावे. हात साबणाने धुवावेत. 
- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री, सोलापूर जिल्हा  

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com