

Behind-the-Scenes Power Play Returns as Council Election Equations Shift
sakal
-विठ्ठल सुतार
सोलापूर: गेली १० वर्षे जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला राहिलेले मोहिते-पाटील विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाले आहेत. मोहिते-पाटील यांनी यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा वा विधानपरिषद निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का दिल्याचा इतिहास आहे. या विधानपरिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत विरोधात वसंतराव देशमुख हे उमेदवार असले तरी मोहिते-पाटील यांनी ही निवडणूक हातात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आव्हान देत निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. निवडणुकीची रणनीती पालकमंत्री गोरे यांनी आखली असली तरी डाव मात्र मोहिते-पाटलांनी टाकला आहे. आता हा डाव पालकमंत्री गोरे कसा उलटवणार हे पहावे लागणार आहे.