

Jaykumar Gore Says Mahayuti United, Open to Dialogue with Opposition
सोलापूर: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांच्या तोकड्या संख्याबळावर सूचक टोला लगावताना काँग्रेसच्या उमेदवारासाठी सूचकांची नावे मिळावीत यासाठी फोन आल्याचा दावा केला. त्याचबरोबर निवडणूक लढवून फारसा फायदा होत नसेल, तर विरोधकांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत विचार करावा आणि जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण करावा, असेही त्यांनी म्हटले.