सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचेच! बाहेरील जिल्ह्यातील ‘हा’ नेता होणार होणार पालकमंत्री; १५ दिवसांत जाहीर होणार नाव

सोलापूरचा पालकमंत्री फायनल झाला असून पुढील आठ-पंधरा दिवसांत त्यांचे नाव जाहीर होईल, असा विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी आज व्यक्त केला. जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक पाच आमदार भाजपचे असल्याने सोलापूरचा पालकमंत्री भाजपचाच होईल, असे आता निश्चित झाले आहे.
Satara Assembly Results Devendra Fadnavis Jaykumar Gore
Satara Assembly Results Devendra Fadnavis Jaykumar Goreesakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्याचा पालकमंत्री फायनल झाला असून पुढील आठ-पंधरा दिवसांत त्यांचे नाव जाहीर होईल, असा विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी आज व्यक्त केला. जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक पाच आमदार भाजपचे असल्याने सोलापूरचा पालकमंत्री भाजपचाच होईल, असे आता निश्चित झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळच्या आमदारांमध्ये जयकुमार गोरे यांचेही नाव आघाडीवर आहे. मागच्या आठवड्यात जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांची यादी सोशल मिडियावर प्रसारित झाली. त्यात सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांचेच नाव होते. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनीही त्यांच्याच नावाची चर्चा असल्याचे सांगितले. पालकमंत्री नसल्याने विविध विभागाच्या मंत्र्यांना बैठका घेऊन प्रश्न सोडवावे लागत आहेत.

उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनासाठी दरवर्षी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापुरात येऊन घ्यावी लागली. दुसरीकडे विधानसभा निवडणूक होऊन दीड महिने होत आले, तरीदेखील जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली नाही. आर्थिक वर्ष संपत आले, तरीदेखील दुसऱ्या टप्प्यातील निधी जिल्हा नियोजन समितीला मिळालेला नाही, अशीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्र्यांची गरज असल्याचेही जाणकार सांगतात.

चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी गोरेंना संधी?

२०१९ ते २०२४ या पाच वर्षांत (अडीच वर्षे महाविकास आघाडी आणि अडीच वर्षे महायुती सरकार) सोलापूर जिल्ह्याने दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे आणि पुढच्या अडीच वर्षात चंद्रकांत पाटील, असे पाच पालकमंत्री पाहिले. पण, आता पाच वर्षांसाठी एकच पालकमंत्री दिल्यास जिल्ह्यातील आमदारांमध्ये समन्वय राहील, विकासाला गती मिळेल, असा विश्वास भाजप पक्षश्रेष्ठीस आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता जयकुमार गोरे यांच्यावर पालकमंत्रीपदाची धुरा जाईल, असा विश्वास भाजप आमदारांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com