Solapur : पालकमंत्र्यांनी केली नवीन महसूल भवन इमारतीची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : पालकमंत्र्यांनी केली नवीन महसूल भवन इमारतीची पाहणी

सोलापूर : सातरस्ता येथील नियोजन भवन शेजारी बांधण्यात आलेल्या नवीन महसूल भवनची पाहणी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज केली.

यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक संजय माळी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नवीन महसूल इमारत अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधांनी युक्त असून, जिल्हाधिकारी कार्यालयासह अधिनस्त प्रमुख कार्यालये या नवीन महसूल भवनात लवकरच सुरू होणार आहेत. या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावेळी महसूल भवनातील सर्व दालनांची, अधिनस्त कार्यालयांची पालकमंत्री विखे-पाटील यांनी पाहणी केली. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पार्किंग व्यवस्था, कर्मचारी बैठक व्यवस्था, पाणी व्यवस्था, बैठक सभागृहाची पाहणी केली. नवीन महसूल भवनामध्ये उपलब्ध सुविधा तसेच येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी आवश्‍यक सूचना दिल्या.