esakal | Solapur : जिल्ह्यात ४७ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur : जिल्ह्यात ४७ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित

Solapur : जिल्ह्यात ४७ हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: बार्शी तालुक्‍यात एक तर मोहोळ तालुक्‍यातील २९ गावांत सध्या पूरपरिस्थिती आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार बार्शी तालुक्‍यात १२ घरांची, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात तीन घरांची, करमाळा तालुक्‍यात चार घरांची, मंगळवेढा तालुक्‍यात तीन घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील ४४ हजार ७६३ हेक्‍टर जिरायत क्षेत्र तर २ हजार ११३ हेक्‍टर बागायत क्षेत्र बाधित झाले आहे. २९ हेक्‍टरवरील फळपिकांचे क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दुरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून जिल्ह्यातील पूरस्थितीची व पीक नुकसानीची माहिती घेतली. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी पूरस्थिती, अतिवृष्टी झाली आहे, सीना नदी काठच्या गावांना रेड अलर्ट जारी करण्याच्या सूचना देवून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन श्री. भरणे यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याची सूचनाही श्री. भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

परिस्थिती पूर्वपदावर

आंदेवाडीचा (ता. अक्कलकोट) पुरामुळे सोमवारी (ता. २७) संपर्क तुटला होता. या गावाची लोकसंख्या १ हजार ४०० आहे. गावात रक्तदाबाचे १०, रक्तदाब आणि मधुमेहाचे २५ रूग्ण, आस्थमाचे १२ रूग्ण आहेत. पाच गरोदर महिलांपैकी नऊ महिन्याच्या एका गरोदर महिलेचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने तातडीने गावामध्ये भारतीय रेल्वेच्या ट्रॉलीव्दारे मेडिकल त्या ठिकाणी युनिट पाठविले. आता त्या गावामध्ये परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्ह्यात पूरपरिस्थिती ओढावली तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने राज्य शासनाकडे बोटीची मागणी केली होती. राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी पाच इंजिन बोटी मंजूर केल्या आहेत. आठवड्याभरात जिल्ह्याला त्या मिळतील.

- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री

loading image
go to top