
Tembhurni Crime
Sakal
टेंभुर्णी : टेंभुर्णीनजिकच्या वेणेगांव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात पंढरपूर येथील दोन मित्र व त्यांचे सहकार्यांमध्ये नाचगाण्याची बैठक लावण्याच्या कारणावरून भांडण लागले. हे भांडण सोडवत असताना त्यापैकी एकाने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून जीवे मारण्याच्या हेतूने गोळी झाडली असता या गोळीबारात वाखरी (ता. पंढरपूर) येथील देवा बाळु कोठावळे (वय 27) यांच्या मांडीत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. टेंभुर्णीतील खासगी रुग्णालयात कोठावळे यास दाखल केले असून डाॅक्टरांनी शस्त्रक्रियाकरून गोळी बाहेर काढल्याने प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.