esakal | औरंगाबादकडे जाणारा गुटखा सांगोला पोलिसांनी पकडला
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

औरंगाबादकडे जाणारा गुटखा पोलिसांनी पकडला

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : पोलिसांना (Police) मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कर्नाटकातून (Karnataka) औरंगाबादकडे (Aurangabad) गुटखा घेऊन निघालेला पिकअप पकडला. ही कारवाई ता. 1 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सांगोला-कडलास (Sangola-kadlas) रोडवर केली. या कारवाईत पोलिसांनी (Police) सहा लाख 60 हजार रुपयांचा गुटखा व पाच लाख रुपयांचे वाहन, असा 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेरु नवाब पठाण (रा. अबरार कॉलनी, औरंगाबाद) व महम्मद असिफ जब्बार काच्चीया (रा. मुघल दरबार हॉटेलच्या पाठीमागे, सदाफ कॉलनी, औरंगाबाद) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कर्नाटकातून औरंगाबादकडे येणाऱ्या पिकअपमधून (एमएच 20/ईएल 5849) गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सांगोला पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक आप्पासाहेब पवार, पोलिस नाईक देवकते, पोलिस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शिंदे यांनी सोनंद चौक, जवळा, कडलास, मिरजरोड, एखतपुर पाटी या भागात नाकाबंदी केली. पिकपमध्ये हिरा कंपनीच्या गुटख्याची 30 पोती व रायल 717 तंबाखूची 15 पोती आढळून आली. पोलिसांनी वाहन चालक शेरु नवाब पठाण व त्याचा साथीदार महम्मद असिफ जब्बार काच्चीया यांना अटक केली.

हेही वाचा: मुंबई पोलिसांनी सिद्धार्थची कार केली जप्त; काल रात्री काय घडलं?

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात चार लाख 29 हजार रुपये किमतीचा हिरा पान मसाल्याची 30 पोती, दोन लाख 31 हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखूची 15 होती, असा 6 लाख 60 हजार रुपये किमतीचा साठा मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख 60 हजार रुपयांचा गुटखा, पाच लाख रुपये किमतीचे वाहन, असा 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

loading image
go to top