

Barber Services Become Costlier in Solapur from July 1; New Rates Announced
sakal
सोलापूर : नाभिक दुकानदार बहुउद्देशीय संस्थेने १ जुलैपासून १० टक्के दरवाढ जाहीर केली असून, आता साध्या कटिंगला १३० रुपये, तर साध्या दाढीसाठी ७० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मासिक पंधरा-वीस हजार रुपये पगारात घर चालविणाऱ्या सर्वसामान्याला, महिन्यातून पाच-सहा वेळा दाढी व एकदा कटिंग करणाऱ्याला महिन्याला किमान पाचशे रुपये दाढी व कटिंगसाठी बाजूला ठेवावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे सोलापूरकरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.