१ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wish.jpg
birthday wish.jpg
Updated on

कुर्डुवाडी (सोलापूर) : प्रत्येकाच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर १ जुन रोजी वाढदिवस असलेली शेकडोंची फ्रेंडलिस्ट आहे. त्यामुळे बहुतांश लोक सामूहिकरीत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतील. या वाढदिवसाला अनेकांनी तर गमतीने शैक्षणिक किंवा सरकारी वाढदिवस म्हणून संबोधले आहे.  पुर्वीच्या काळात साधारणपणे १९७९ च्या आधी जन्म झालेल्या अनेकांच्या जन्मतारीखेची नोंद केलेली नसायची. जन्मदाखले उपलब्ध नसायचे. त्यामुळे त्या मुलाला किंवा मुलीला शाळेत घालताना तात्कालिन शिक्षकांना पालक अंदाजे जन्मतारीख सांगायचे किंवा तुम्हीच लिहा म्हणायचे. त्यामुळे अनेकांच्या जन्मतारखा १ जुन झाल्या. यातील काहींची खरी जन्मतारीख १ जुन आहे.
सोशल मीडियावर असणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या अकाउंटशी १ जुन रोजी वाढदिवस असणारे शेकडो फ्रेंडस जोडलेले आहेत. सध्या सोशल मीडियावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याची मोठी टूम आहे.  या दिवशी प्रत्येकाला वैयक्तिक शुभेच्छा देताना खूप वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे अनेकजण '१ जुन रोजी वाढदिवस असणाऱ्या माझ्या फेसबुक फ्रेंडसना शुभेच्छा' अशा सामुहिक रित्या शुभेच्छा देतील. या शुभेच्छा स्वीकारताना त्यांनाही विशेष आनंद होतो कि नाही याबाबतही साशंकता आहे. काही संस्था किंवा कार्यालयात प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतात. गेल्या वर्षी त्या संस्था किंवा कार्यालयातील १ जुन रोजी वाढदिवस असणाऱ्यांचा एकत्रितपणे केक कापून वगैरे सामुहिकरित्या  साजरा केल्याचे पहावयास मिळाले. यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे हे चित्र पहावयास मिळणार नाही. परंतु सोशल मीडियावर मात्र सामुहिकरित्या शुभेच्छा दिलेल्या नक्कीच पहावयास मिळणार आहेत. 
कुर्डुवाडीतील मुख्य आयुर्विमा सल्लागार तानाजी काटे म्हणाले, जन्माच्या वेळी नोंद नसल्याने माझी १ जुन ही जन्मतारीख खरी नाही. यादिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना आनंद वाटत नाही.
शेखर कोले म्हणाले, १ जुन रोजी वाढदिवस असलेले माझे शेकडो फेसबुक फ्रेंडस आहेत. '१ जुन रोजी शैक्षणिक  किंवा खरा वाढदिवस असलेल्या सर्व फेसबुक फ्रेंडसना वाढदिवसाच्या शुभेच्छा' अशा सामुहिक शुभेच्छा देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com