
सोलापूर: ‘तुझ्या माहेरच्यांनी विवाहात मानपान केला नाही, तुला स्वयंपाक येत नाही, तुझे खानदान चांगले नाही, तू लग्न करून आल्यापासून घराला साडेसाती लागली’ असे म्हणून सासरच्यांनी छळ केल्याची फिर्याद प्रणाली आदित्य पाखरे (रा. शुक्रवार पेठ, लक्ष्मी मंदिराजवळ) यांनी सदर बझार पोलिसांत दिली.