
सोलापूर: महापालिकेच्या आशा वर्कर्सना पैशाचे आमिष देऊन महापालिकेतील प्रसूतिगृहात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना खासगी दवाखान्यात पाठवल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी आज डफरीन चौकातील महापालिकेच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहास अचानक भेट दिली. प्रसूतीसाठीच्या रुग्णांना विनाकारण सिव्हिल हॉस्पिटलला पाठविल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.