Health Workers साठी गूड न्यूज! नववर्षात 'या' कर्मचाऱ्यांना प्रमोशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Workers
Health Workers साठी गूड न्यूज! नववर्षात 'या' कर्मचाऱ्यांना प्रमोशन

Health Workers साठी गूड न्यूज! नववर्षात 'या' कर्मचाऱ्यांना प्रमोशन

सोलापूर : कोरोना (Covid-19) काळात स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असतानाही आरोग्यसेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यकांनी (Health Workers) सामाजिक बांधिलकीतून खूप काम केले. ड्यूटीच्या वेळेवर बोट न ठेवता त्यांनी तासन्‌तास काम करण्यात घालवले. त्यांना आता प्रमोशनाच्या (Promotion) माध्यमातून नवीन वर्षात गूड न्यूज दिली जाणार आहे. (Health workers who served during the Covid period will get promotions in the new year)

जिल्हा परिषदेच्या (Solapur ZP) आरोग्य विभागाकडील (Health Department) 34 आरोग्यसेविकांना आरोग्य सहाय्यिका म्हणून पदोन्नती दिली जाणार आहे. तर दुसरीकडे 20 आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी बढती मिळणार आहे. तसेच आरोग्य विभागातील पाच आरोग्य सहाय्यकांना आरोग्य पर्यवेक्षक म्हणून संधी दिली जाणार आहे. जिल्हा आरोग्याधिकारी (District Health Officer) डॉ. शीतलकुमार जाधव (Dr. Sheetalkumar Jadhav) यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव तयार केला आहे. शासकीय निकषांनुसार वर्षानुवर्षे काम केल्यानंतर त्यांना बढती मिळते. परंतु, काही कारणास्तव त्याची प्रक्रिया झालेली नव्हती. जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालून आता प्रस्ताव अंतिम केला आहे. काही दिवसांत तो प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केला जाणार आहे. काही दिवसांत त्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास डॉ. जाधव यांनी यावेळी व्यक्‍त केला. कोरोना प्रतिबंधित लसीकरण (Covid Vaccine), नियमित लसीकरण, ओपीडी, कोरोना संशयितांची टेस्ट (Covid Test), रुग्णांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग अशी विविध कामे आरोग्य कर्मचाऱ्यांनी पार पाडली आहेत. पदोन्नतीच्या माध्यमातून पात्र असलेल्यांना नववर्षात गूड न्यूज मिळणार आहे.

हेही वाचा: तिसरी लाट सुरू? पुढील टप्प्यातील ठरले निर्बंध; असे असतील कडक नियम

आरोग्य विभागातील आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, सहय्यिकांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांत त्याचा निर्णय जाहीर होईल.

- डॉ. शीतलकुमार जाधव, आरोग्याधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

हेही वाचा: जगात सर्वाधिक विकले जाणारे 10 व्हिस्की ब्रॅंड; पैकी 7 आहेत भारतीय

शाळेत, गावोगावी लसीकरणाचे नियोजन

जानेवारीत जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जाणार आहे. ओमिक्रॉन (Omicron) व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळा सुरू राहतील की बंद होतील, याबद्दल आताच स्पष्टपणे सांगता येणार नाही. तरीही, शाळा सुरू राहिल्यास त्या वयोगटातील मुलांना शाळेत आणि गावोगावी सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर लस टोचली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी यावेळी दिली. वेळप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swamy) यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण केंद्रेही वाढविली जातील. काही दिवसांत 100 टक्‍के लसीकरण होईल, यादृष्टीने नियोजन केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top