
सोलापूर: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर एकूण ७८ हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासमोर गुरुवारी (ता. ४) सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर बाजार समितीची अंतिम मतदार यादी ९ सप्टेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.