
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या एका वृद्ध भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास कासार घाटाजवळ घडली. कृष्णा शंकरराव जाधव (वय ६४, रा. कोल्हापूर) असे मयत भाविकाचे नाव आहे.