सोलापूर - नात्यातील तरुणीने लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणाने शहरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. हरीश भास्कर बंडी (वय २९, रा. वल्लभनगर, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे..या प्रकरणी मुलीसह आई-वडिलांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. या घटनेची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे. नात्यातीलच मुलीसोबत मागील ६ वर्षांपासून मुलाचे प्रेमसंबंध होते. लग्नाची मागणी घालण्यासाठी आम्ही मुलीच्या घरी दोन वेळा बोलणीही झाली होती..पण मुलीच्या आई-वडिलांनी पत्रिका न जुळल्याचे कारण सांगून लग्नास नकार दिला होता. यामुळे मुलगा हरीश बंडी हा मानसिक नैराश्येत गेला. त्याला आम्ही समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर मुलाने आत्महत्या केल्याचे मुलाच्या आईने सांगितले..मुलीला एकदा समोर बसून विचारामुलीने लग्नास नकार दिल्याने मुलाने अखेर गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलीच्या आई-वडिलांनी पत्रिका जुळत नाही, म्हणून लग्न करण्यास नकार दिला होता. यावर मुलाच्या आईने ती नाही, तर दुसरी बघू असे समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला..पण मुलाने मुलीस समोर बसून एकदा विचारण्याची विनवणीही केली होती, पण मुलीच्या आई-वडिलांनी ही मागणी मान्य केली नाही. मुलीचा मोबाईल बंद ठेवला. मुलीने मुलासोबत बोलणे बंद केल्याने मुलगा डिप्रेशनमध्ये जात लॉजवर आत्महत्या केल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.