

Gursale Accident Tipper Runs Over Father and Son, Both Dead
Sakal
पंढरपूर/लऊळ : शाळेत आजारी असलेल्या मुलाला घेऊन घरी परतणाऱ्या पित्याच्या आयुष्यात काळाने असा घाला घातला, की अवघ्या काही क्षणांत पिता-पुत्र दोघेही मृत्युमुखी पडले. पंढरपूर-टेंभुर्णी महामार्गावरील गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर मातीने भरलेल्या टिप्परची मोटारसायकलला जोराची धडक बसली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. २०) दुपारी एक ते अडीचच्या दरम्यान घडली.