अक्कलकोटमध्ये पावसाची दमदार हजेरी 

akkalkot paus.jpg
akkalkot paus.jpg
Updated on


अक्कलकोट(सोलापूर)ः शहर व परिसरात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे एक तासभर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसाने हजेरी लावल्याने पेरण्या झालेल्या सर्व पिकांना फायदा होणार आहे. 

आज दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सुमारास पावसाने सुमारे एक तासभर दमदार हजेरी लावली. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक गटारी मध्ये गाळ तुंबल्याने पाणी रस्त्यावर वाहत होते. 

पावसाने हजेरी लावल्याने पेरण्या झालेल्या तूर, उडीद, मूग, बाजरी, तीळ, भुईमूग आदी पिकांना फायदा होणार आहे. सध्या सूर्यफुलाच्या पेरणी सुरू असल्याने त्याला सुद्धा हा पाऊस उपयोगी पडणार आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतीचे काम करण्यासाठी जाताना,बी बियाणे व खते खरेदीसाठी जनता कर्फ्यु असल्यामुळे बाहेर पडता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा त्रास होत आहे. पण पोलिस खाते शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी शेतात जाण्यासाठी सवलत देत आहे. 
मृग, आद्रा नंतरच्या या पुनर्वसु नक्षत्राच्या दमदार पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्‍यता आहे. अशाच प्रकारे आणखी दोन तीन दमदार पाऊस पडल्यास जमिनीतील जलस्तर वाढून विहिरी व विंधन विहिरींना फायदा होईल. 


सर्वच नक्षत्रामध्ये पावसाची हजेरी 
यावर्षी तीन नक्षत्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा उपयोग शेती हंगामाला चांगल्या पध्दतीने होणार आहे. 
- दत्तूकुमार साखरे, प्रगतशील शेतकरी 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com