सांगोला - सांगोला तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून शनिवारी (ता. २७) दिवसभर पुन्हा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील तब्बल २७ घरांची पडझड झाली असून जनावरांच्या मृत्यूच्याही घटना घडल्या आहेत..या मुसळधार पावसामुळे अंदाजे ३० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून मुरघास खड्ड्यांमध्ये पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात चारा वाया गेला आहे.पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व तहसीलदार संतोष कणसे यांनी गावोगावी जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकरी व नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची हमी दिली. पावसामुळे आणि छोटे मोठे रस्त्यांवर पाणी आल्यामुळे काही वेळासाठी रस्ते बंद पडले होते. जवळा-सांगोला तसेच धायटी-शिवणे असे मार्ग वाहतुकीसाठी बंद होते..तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. शेतमाल, चारा, घरांची पडझड यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून तातडीने शासकीय मदतीची गरज आहे.शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते त्यामुळे शहरवासी यांचे अतिशय हाल झाले. तालुक्यातील डाळिंब, केळी, पेरू, ड्रॅगन फ्रुट अशा विविध फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. फळपिकांसह मका पिकाचे नुकसान झाले आहे..बुद्धीहाळ जलसिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी गौडवाडी, बुद्धीहाळ, उदनवाडी, पाचेगाव, हातीद, चोपडी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनावश्यक प्रवास टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत..तालुक्यात विविध गावांतील नागरिकांच्या घरांची झाली पडझड -चिकमहुद-पांडुरंग बाबू बंडगर, भारत दत्तात्रय भोसले, कराडवाडी-आकाराम आलदर, किडेबिसरी-सिताबाई ढाळे, दयानंद साबळे, पौर्णिमा साबळे, घेरडी-दत्तात्रय घुटुकडे, पोपट करे, गोरजनी पाटील, मशाकसो पाटील, खेडू जाधव, गिरीश चंदनशिवे, शंकर गंड, राजुरी-प्रकाश दबडे, बाबासाहेब व्हरगर, कोंबडवाडी-संतोष सरगर, पाचेगाव बु.-वसंत काबुगडे, चोपडी-दगडू जगताप, जुजारपूर-अमृत पाटील, जवळा-ललिता साळे, वाणी चिंचाळे-सुखदेव घुणे, कोळा-नारायण इमडे, बलवडी-छाया यादव, डिकसळ-तुकाराम करांडे, बापू भुसनर, अशोक निळे, औदुंबर निळे, तसेच विठ्ठल मोहीते यांची घरे पडली आहेत..तीन जनावरांचा मृत्यू -मांजरी : अंगद जगताप यांची जर्सी गायकारंडेवाडी बु : सुधाकर बाबा टोणे यांची शेळीवझरे : प्रकाश पाटील यांचा रेडकू.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.