

INTACH Raises Alarm Over Preservation of Ancient Stone Labyrinth
Sakal
सोलापूर: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह बोरामणी गवताळ सफारी शेजारी खडकी (ता. तुळजापूर) येथे आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचा हा वारसा सांभाळावा तसेच याचे संवर्धन करावे, अशी आर्त हाक इंट्याकने शासनाकडे दिली आहे. निसर्ग, भूगर्भशास्त्र आणि इतिहासाचा त्रिवेणी संगम असलेल्या खडकीतील चक्रव्यूहाचे संवर्धन करावे, अशी मागणी ''इंट्याक''च्या वतीने करण्यात आली.