
सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वार पूनम गेटजवळील १४ खोकी महापालिका अतिक्रमण विभागाने आज दुपारी हटविली. कारवाईप्रसंगी १२ जणांनी आपली खोकी स्वतःहून काढून घेतली तर दोन खोकी महापालिका पथकाने जेसीबीच्या साह्याने काढली. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या येथील वादावर अखेर पडदा पडला असून अखेर जिल्हा परिषद प्रवेशद्वाराने मोकळा श्वास घेतला आहे.