High Interest in Laxmi Dahiwadi Womens Aspire for Reserved ZP election Seat
sakal
मंगळवेढा - लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात राखीव महिला जागेसाठी दहा इच्छुक महिलांनी पदर खोचला असून त्यामध्ये सध्या बहुरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या गटात जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी बाहेरच्या महिलांनीच अधिक लक्ष घातले. कुणाच्या पदरात सदस्यत्वाची माळ पडणार याकडे लक्ष लागले.