पंढरपुरातील कोरानाने उडविली जिल्ह्याची झोप; नवे बाधित 335, सहा जणांचा मृत्यू, 246 कोरोनामुक्त 

Corona
Corona
Updated on

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहर व तालुक्‍यात वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढवू लागली आहे. भोसे (ता. पंढरपूर) येथील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाची दहशत संपूर्ण जिल्हाभर अधिकच गडद झाली आहे. गुरुवारी नव्या 335 कोरोनाबाधितांची भर पडली असून त्यामध्ये एकट्या पंढरपूर तालुक्‍यातील 101 बाधितांचा समावेश आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सोलापूर शहरातील पाच्छा पेठेत सापडला. ग्रामीण भागात सांगोल्यापासूनच कोरोनाची सुरवात झाली असली तरीही अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी तालुके कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहर व तालुक्‍यामध्ये दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची व मृतांची संख्या ही सर्वांची झोप उडवू लागली आहे. सोलापूर जिल्ह्याचा मध्यवर्ती तालुका म्हणून व इतर तालुक्‍यांसाठी विविध कारणास्तव संपर्कात असलेला तालुका म्हणून पंढरपूरची ओळख असल्याने पंढरपूरचा कोरोना जवळपास जिल्ह्यासाठी घातक मानला जात आहे. 

सध्या जिल्ह्यात सर्वाधिक 1451 कोरोनाबाधित रुग्ण पंढरपूर तालुक्‍यात सापडले आहेत. पंढरपूर 27 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असून 537 जण कोरोना मुक्त झाले आहेत. अद्यापही 887 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिका हद्दीत 94 तर जिल्हा परिषदेत 241 अशा एकूण 335 कोरोना बाधितांची भर जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीत पडली आहे. ग्रामीण भागातील पाच व महापालिका हद्दीतील एक अशा सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका हद्दीतील 85 आणि जिल्हा परिषद हद्दीतील 161 असे 246 जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city police
solapur
Suryan Mukne from Pandharpur selected as Sub-Lieutenant in Indian Navy
34th Water Struggle Council in Mangalwedha demands completion of irrigation projects
Marathi News Esakal
www.esakal.com