सोलापूर जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Cane

सोलापूर जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र

माळीनगर - येत्या गाळप हंगामात राज्यात सोलापूर जिल्ह्यात गाळपासाठी उसाचे सर्वाधिक दोन लाख ३० हजार ५० हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा त्यामध्ये सुमारे २४ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ३३ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यंदा विठ्ठल सहकारी व आर्यन शुगर या कारखान्यांची त्यामध्ये भर पडणार आहे.

२०२१-२२ चा गळीत हंगाम राज्यात गेल्या दहा वर्षातील उच्चांकी ठरला. यंदा राज्यात १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ९३४ हेक्टरने घट झाली असली तरी मराठवाड्यात गेल्या १५ दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. साखर आयुक्तालयाकडील नोंदीनुसार गतवर्षीच्या हंगामाच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात सर्वाधिक ४७ हजार ८०५ हेक्टरने घट झाली आहे. पुणे जिल्ह्यातही दोन हजार ३०५ हेक्टर उसाचे क्षेत्र घटले आहे. सांगली जिल्ह्यात ४४ हजार ८७० हेक्टर तर बीड जिल्ह्यात ३४ हजार ६२७ हेक्टर ऊसक्षेत्र वाढले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार ५३१ हेक्टर, जालना जिल्ह्यात १२ हजार ७९३ हेक्टर, नाशिक जिल्ह्यात १० हजार ४२ हेक्टर, जळगाव जिल्ह्यात तीन हजार ९६५ हेक्टर, भंडारा जिल्ह्यात एक हजार ५८० हेक्टर तर वर्धा जिल्ह्यात एक २५२ हेक्टर ऊसक्षेत्र वाढले आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात यंदा देखील उसाचे विक्रमी चार लाख नऊ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध आहे. गेल्यावर्षीपेक्षा तेथे यंदा चार हजार हेक्टर क्षेत्रातील अधिक ऊस आहे. उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात घट झाली असली तरी बीड व जालना या दोन जिल्ह्यात मिळून जवळपास ५७ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेसह कारखाना स्तरावरही ऊस तोडणीचे नियोजन सुरुवातीपासूनच करण्याची गरज आहे. मागील हंगामात एप्रिल, मे महिन्यात सर्वच यंत्रणांवर अतिरिक्त ताण आला होता. त्यामुळे ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. सोलापूर जिल्ह्यात तर होळी सणापासून ऊसतोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याने अनेक कारखान्यांना ''नो केन''स्थितीत गाळप करावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा नियोजनबद्ध गाळप अपेक्षित आहे.

२०२२-२३ मधील गाळप व साखर उत्पादनाचा अंदाज

सरासरी हेक्टरी उत्पादकता ९५ टक्केप्रमाणे एकूण अंदाजित ऊस उत्पादन- १४१३ लाख टन ९५ टक्के ऊस गाळपास येईल असे ग्राह्य धरून ऊस उत्पादन- १३४३ लाख टन सरासरी साखर उतारा ११.२० टक्केप्रमाणे साखर उत्पादन- १५० लाख टन इथेनॉलकरिता डायव्हर्जन होणारी साखर- १२ लाख टन संभाव्य साखर उतारा १०.३० टक्केप्रमाणे इथेनॉल डायव्हर्जनमधील साखर वगळून होणारे साखर उत्पादन- १३८ लाख टन.

जिल्हानिहाय उपलब्ध ऊसक्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा २०२२-२३ हंगाम

सोलापूर २३००५०

कोल्हापूर १७५५६०

अहमदनगर १६००००

पुणे १५७५७०

सांगली १३७५८५

सातारा ११६६२५

बीड ८४२०८

उस्मानाबाद ७४२७५

लातूर ६३१५८

जालना ४७२२७

परभणी ४७०५८

औरंगाबाद ४००००

नांदेड ३५९४३

नाशिक ३०९६५

नंदुरबार २४०४२

हिंगोली १७५२०

जळगाव १६०००

Web Title: Highest Sugarcane Area In Solapur District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top