esakal | महामार्गाचे काम शेतकऱ्याच्या मुळावर! सहा लाखांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसान

महामार्गाचे काम शेतकऱ्याच्या मुळावर! सहा लाखांचे नुकसान

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : पाथरी (ता. बार्शी) येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाअंतर्गत बार्शी-येरमाळा रस्त्यावर महामार्गाचे काम सुरु असून सदोष पुलामुळे दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी जाऊन सहा एकर सोयाबीन पीक पाण्यावर तरंगत आहे. झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तहसीलदार यांचेकडे शेतकऱ्याने केली आहे .

पाथरी हद्दीमध्ये जमीन गट नं.255 बाबासाहेब गायकवाड यांची असून त्यांनी सहा एकर सोयाबीन पीक घेतले आहे पिकास 85 दिवस पूर्ण झाले आहेत त्यास शेंगाही आल्या आहेत.

येरमाळा मार्गावर रस्त्याचे काम सुरु असून महामार्गावर पूर्व- पश्चिम बाजूस पाणी जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे .जमिनीतील येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उत्तर- दक्षिण चारी करण्यात आली होती पण काम सदोष झाल्याने चारीतून पावसाचे पाणी उलट येऊन शेतामध्ये साठले आहे.

हेही वाचा: यॉर्कर किंग लसीथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

सोयाबीन पीक पाण्यामध्ये बुडुन सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून गाव कामगार तलाठी,ग्रामसेवक यांनी पंचनामा करुन दोन हेक्टर सहा आर क्षेत्र पूर्ण पाण्याखाली असून सोयाबीन पिकाचे सहा ते सात लाखांचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.

मागील वर्षीही अशीच परिस्थिती शेतकरी गायकवाड यांच्या शेतात अशीच निर्माण झाली होती त्यांचा ऊस पाण्यामध्ये होता त्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.या कंपनीला तक्रार पत्र 21 जुलै 2020 रोजी देऊन काम परत करण्याची सूचना केली होती पण कंपनीने आजपर्यंत दखल घेतलेली नाही

"पुल उंचीवर बांधला आहे,पूर्वीची सार्वजनिक बांधकाम विभागाची नळी काढून टाकली आहे सर्व पाणी उताराने शेतामध्ये घुसत आहे दोन पिकांचे नुकसान झाले आहे पण काम करणारी कंपनी लक्ष देत नाही शासनाकडेही तक्रार केली आहे अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी करीत आहे."

- बाबासाहेब राजाराम गायकवाड , शेतकरी,पाथरी ता.बार्शी

loading image
go to top