
सोलापूर : हिंदवी परिवाराची पन्हाळा पावनखिंड पावसाळी पदभ्रमंती मोहीम उत्साहात झाली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील साधारण १५० शिवभक्त सहभागी झाले होते. शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली. प्रारंभी वीर बाजीप्रभू देशपांडे व नरवीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मसाई पठार येथे पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक घटनेचा पूर्वार्ध शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितला.