Procession : जागो तो एक बार हिंदू जागो रे..: प्रेरणागीतांनी नववर्षाचे स्वागत; हिंदू नववर्ष समितीची शोभायात्रा
Solapur News : प्रभू श्रीरामांचा व भारत मातेचा जयजयकार करत या मिरवणुकीस सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील स्वयंसेवकांच्या पाठीमागे आजोबा गणपतीचे शंभर जणांचे ढोल पथक आपली सेवा अर्पण करत होते.
Hindu New Year Procession with inspiring hymns and cultural expressions as the community welcomes the new year.Sakal
सोलापूर : हिंदू नववर्षाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हिंदू नववर्ष समितीद्वारे पारंपरिक वाद्यांच्या निनादात शोभायात्रेद्वारे स्वागत करण्यात आले. जागो तो एक बार हिंदू जागो रे अशी प्रेरणागीते गात युवकांनी या शोभायात्रेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.