
सोलापूर : हिंगणी (पा.) (ता. बार्शी) येथील मध्यम प्रकल्प आज (सोमवारी) सकाळी ११.३० वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. धाराशिव जिल्ह्यात व बार्शी तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा वाढत आहे. दरवाजे विरहित असलेल्या या प्रकल्पातून सांडव्याद्वारे भोगावती नदीत अनियंत्रित विसर्ग सुरू झाल्याने भोगावती नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.