हिप्परगा तलाव पर्यटकांना घालतोय साद ; देशी व विदेशी पक्षांचा अधिवास 

HIPPARGA6.jpg
HIPPARGA6.jpg

सोलापूर ः शहरालगत असलेला हिप्परगा तलाव देशभरातील पर्यटक व पक्षी निरीक्षकांसाठी महत्वाचे केंद्र बनत आहे. देशभरातील पक्षी निरीक्षकांनी या ठिकाणी येणाऱ्या देशी व विदेशी अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांचा अभ्यास करून त्यांची निरीक्षणे व संशोधन जागतिक पातळीवर नोंदवली आहे. वर्षभरात शेकडो पक्षी निरीक्षक या तलावास भेट देण्यासाठी येतात. आता दैनिक सकाळच्या पुढाकाराने व डॉ. मेतन फौंडेशनच्या यांच्या सहकार्याने या पक्षीधाम उभारणी व इतर प्रकल्पांना चालना मिळाली आहे. 

हिप्परगा तलावाच्या निर्मितीपासून या तलावातील जैवविविधता कायम राखली गेली आहे. 1874 मध्ये हा तलाव तयार करण्यात आला असला तरी त्याचे स्वरुप अत्यंत नैसर्गीक स्वरुपाचे आहे. विविध मार्गाने येणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी वर्षभर पक्षी व जैवविविधतेसाठी आश्रयस्थान बनले आहे. देशातील अत्यंत महत्वाचे मानल्या जाणाऱ्या पक्षीस्थानांमध्ये या तलावाचे नाव नोंदवले गेले आहे. 


विदेशी पक्ष्यांची उपस्थिती 
या जलाशयात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये देशी पक्ष्यांसह विदेशी पक्ष्यांचा देखील समावेश असतो. बदकाचे अनेक प्रकार येथे पाहण्यास मिळतात. बार हेडेड गीझ, ब्राम्ही डक, क्रेन पक्षी, ग्रेटर स्पॉटेड इगल, हॅरिअर, पाईड ऍडोव्हेट, बुशबर्ड आदी अनेक पक्षी हंगामात जलाशयावर दाखल होतात. व्हाईट स्टॉर्क म्हणजे पांढरा करकोचा हा दुर्मिळ पक्षी या ठिकाणी पाहण्यास मिळतो. केस्ट्रॉल, गल सीगल, रुडी शेल डक (ब्राम्ही बदक) किंवा तीन हजार किमी अंतरावरून येणारा बार हेडेड गीझ हे पक्षी या तलावावर येतो. पक्षी पाहण्यासाठी परराज्यातील पक्षी निरीक्षक येथे हजेरी लावतात. 

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पक्षीअभ्यासक व निरीक्षकांची हजेरी 
सुप्रसिध्द पक्षी निरीक्षक डॉ. सलीम अली यांनी जेव्हा या तलावाला भेट देऊन पक्षी निरीक्षण केले होते, तेंव्हा त्यांनी देखील या तलावास पक्ष्यांचे नंदनवन असे संबोधले होते. यावरून या तलावाचे पक्षी वैविध्याचे महत्व अधोरेखीत झाले. देशातील नामवंत छायाचित्रकार अनंत गुर्जी, डॉ. प्रदिप राव (बेंगलोर), हुसेन लतीफ (हूबळी), विनायक झिंगाडे, भारती झिंगाडे, संतोष मराठे, हेमंत काळे (पुणे), जयंत सेठी (मुंबई) आदींनी या जलाशयावर पक्षीनिरीक्षण केले आहे. 

कमी अंतरावरून पक्षी निरीक्षणाची संधी 
जलाशयाचे क्षेत्र मोठे असल्याने जैवविविधता कायम टिकून राहिली आहे. या तलावामध्ये जैवविविधता आपणास पाहण्यास मिळते. यामध्ये अनेक प्रकारचे किटक, पाणवनस्पती यांचा समावेश आहे. तसेच विविध प्रकारचे मासे देखील येथे मोठ्याप्रमाणात आहे. मासेमारीसाठी मत्स्यबीज देखील जलाशयात सोडले जाते. या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी सातत्याने संशोधक येतात. या तलावाच्या भौगोलिक रचनेमुळे पक्षी निरीक्षकांना अत्यंत कमी अंतरावरून पक्ष्याची छायाचित्रे व अभ्यास करता येतो. हे अंतर अगदी केवळ दोनशे ते तीनशे मीटर एवढे कमी आहे. इतर पक्षी निरीक्षण केंद्रावर हे अंतर खुपच मोठे असल्याने संशोधकांना हिप्परगा तलावाचे महत्व अधिक वाटते. 

प्रशासनाचाही पुढाकार 
पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हिप्परगा तलाव विकासासाठी एक समिती नेमून या ठिकाणी पर्यटन व पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित व्हावे, यासाठी सुशोभीकरणाच्या कामाच्या कामास मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सुशोभीकरण आरखडा तयार करण्याचे आदेश दिले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. शासन व प्रशासनाने हिप्परगा तलावाच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार पाहता पुढील काळात देश पातळीवर हे पक्षी निरीक्षण केंद्र विकसित करण्यासाठी गती मिळणार आहे. 


हिप्परगा तलावावर कसे जावे 
- सोलापूर शहरापासून दोन किमी अंतरावर 
- साध्या वाहनाने जाण्यासाठी रस्ता 
- एकरुखला पक्षी निरीक्षणाची सोय 
ृ- हिवाळी हंगामात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी 

सकाळचा पुढाकार तर डॉ. मेतन फौंडेशनचे सहकार्य 
हिप्परगा तलावावर राष्ट्रीय पक्षी निरीक्षण केंद्र व्हावे यासाठी दैनिक सकाळ व डॉ. मेतन फौंडेशनच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांमुळे काही महत्वाच्या सुविधा उपलब्ध होत आहे. या ठिकाणी एक स्थायी स्वरुपाचे पक्षी छायाचित्र प्रदर्शन सभागृह उभारले जाणार आहे. तसेच पक्षी निरीक्षणासाठी पक्षीधाम प्रकल्प साकारला जाणार आहे. 

पक्षी निरीक्षण केंद्राचा विकास व्हावा 
हिप्परगा तलाव हा आता राष्ट्रीय पातळीवरील महत्वाचे पक्षी निरीक्षण केंद्र बनला आहे. अनेक दुर्मिळ क्रेन सारख्या पक्ष्यांच्या प्रकार या ठिकाणी पाहण्यास मिळतात. पुढील काळात या पक्षी निरीक्षण केंद्रांचा विकास करावा यासाठी प्रयत्न करणे अधिक महत्वाचे आहे. 
- डॉ. व्यंकटेश मेतन, संस्थापक, मेतन फौंडेशन 

पर्यनाच्या संधी वाढाव्यात 
तलावाचे भव्य क्षेत्र असल्याने येथील जैवविविधता अत्यंत चांगल्या पध्दतीने विकसित झाल्याचे दिसून येते. 2018 मध्ये जलसंपदा विभागाच्या मशिनरीद्वारे तलावाचा भराव सुस्थितीत आणला गेला. उजनीचे पाणी या तलावात टाकण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी तलावातील पाणीसाठ्याची शाश्‍वत सोय झाल्याने गाळ काढल्यास पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. पुढील काळात तलावातील गाळ काढला जाण्याची आवश्‍यक्ता आहे. पक्षी निरीक्षण व पर्यटनाच्या सोयी या ठिकाणी व्हाव्यात. 
- प्रल्हाद कांबळे, जल अभ्यासक, सोलापूर  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com