
सोलापूर : पावसाळा आला की नाल्यातील गाळ काढणे हे वर्षानुवर्षे ठरलेले. परंतु शहरातील नाल्यांचा कठडा, नाला परिसरातील अतिक्रमण, झाडी झुडपे काढून नाल्यांची रुंदी वाढविणे. पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी सिमेंट काँक्रिटने दुरुस्त करणे ही कामे ३२ वर्षांनंतर हाती घेण्यात आली आहेत. महापालिकेने पहिल्या टप्प्यात शहरांतर्गत येणारे साधारण २४ किलोमीटर अंतराचे १९ नाले दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेंतर्गत ९८ कोटींच्या कामाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्यक्षात १ जुलैपासून संबंधित मक्तेदाराकडून नाल्याच्या सर्व्हेला सुरुवात केली जाणार आहे.