
सोलापूर: एचआयव्ही होणाऱ्या चार कारणांपैकी एक कारण म्हणजे आईपासून अपत्याला होणारा संसर्ग होय. मात्र, योग्य खबरदारी घेतल्याने तीन वर्षांत एचआयव्ही बाधित मातेच्या पोटी जन्मलेल्या २५९ बालकांना संसर्ग झाल्याचे आढळले नाही. जिल्हा एड्स प्रतिबंधक पथकाच्या कार्यतत्परतेमुळे संसर्गाचे प्रमाण घटले आहे.