पार्टी करून बिल देत नाहीत, हॉटेल मालकाने अडवला सदाभाऊंचा ताफा

hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bil
hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bil

सांगोला : सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथे एका हॉटेलात पार्टी केल्यानंतर बिल दिले नसल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांचा ताफा आडवल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या हॉटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bill)

सांगोला, दत्तात्रय खंडागळे : "भाऊ, आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा." असे म्हणत सांगोला तालुक्यातील एका हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकाऱ्याने पंचायत राज समितीच्या दौऱ्यासाठी तालुक्यात आलेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पंचायत समितीच्या आवारात गाडीतून उतरताच बोलू लागल्याने तेथे सर्वांचा एकच गोंधळ उडाला.

नेमकं काय घडलं?

सांगोला तालुक्यांमध्ये आज पंचायत राज समितीचे पथक दौऱ्यासाठी आले होते. या दौऱ्यामध्ये आमदार अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे व आमदार सदाभाऊ खोत होते. तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीची पाहणी केल्यानंतर सांगोला तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयाकडे आले. सर्वप्रथम आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली असता गाडीमधून सदाभाऊ खोत उतरताच मांजरी (ता. सांगोला) येथील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे त्यावेळचे पदाधिकारी असलेले व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी गाडी मधून आमदार सदाभाऊ खोत खाली उतरताच 'भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु 2014 च्या निवडणुकीचे माझी अगोदर उधारी द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.' असे म्हणू लागले. 

 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार सदाभाऊ खोत हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. त्यावेळी सांगोला तालुक्यातील मांजरी या गावचे असलेले अशोक शिनगारे यांचे हॉटेलची उधारी होती. शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी असल्याचे अशोक शिनगारे यांनी आपल्या उधारीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.

hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bil
केतकी चितळेला ठाणे कोर्टाकडून जामीन, तरीही राहणार जेलमध्ये

हॉटेल मालकाच्या आरोपांबाबत बोलताना खोत यांनी मी त्या मालकाल ओळखत नाही असे सांगितले आहे. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शन करणार होते पण माझा ताफा लवकर आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे त्यांचं नियोजन बारगळलं, मी २०१४ पासून मी १५ वेळा सांगोल्यात आलो आहे. मी त्या माणसाला ओळखत नाही. राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिले आहे.

hotel owner stopped Sadabhau Khot motor convoy at Sangola for alleging not paying the meal bil
''शरद पवारांसारखा नेता राष्ट्रपती झाल्यास देशात दहशतवाद वाढेल''

दरम्यान हॉटेल मालकाविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आह, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. हा दहा वर्ष का गप्प होता असा शोध घेतला पाहीजे असेही सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तसेच आपण कोणतंही बिल थकवलं नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com