
कुर्डुवाडी: घराला कुलूप लावून स्लॅबवर व अंगणात ओट्यावर झोपले असताना, कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना खडकाळी वस्ती कव्हे (ता. माढा) येथे रविवारी (ता. २०) च्या रात्री घडली. याबाबत सीताराम बाळासाहेब ढेरे (वय ४१, रा. कव्हे) यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.