गृहिणींचे बजेट 'या' निर्णयाने कोलमडणार...सोलापुरात दूध दरात चार रुपयांची वाढ 

family budget colapes
family budget colapes
Updated on

सोलापूर : कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह अन्य जिल्ह्यांमधील महापुरामुळे जनावरांची संख्या घटली तर काही भागात जनावरांच्या आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे दूध संकलनात 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाल्याने खासगी दूध संघांनी खरेदी दरात दोन ते तीन रुपयांची वाढ केली. या पार्श्‍वभूमीवर खासगी दूध विक्रीत चार रुपयांच्या दरवाढीचा निर्णय सोलापूर दूध व्यापारी संघाने घेतला आहे. 1 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संघाने स्पष्ट केले. 


ग्राहकांची दुधाची वाढलेली मागणी आणि कमी पडू लागलेला पुरवठा, यातील तफावतीमुळे खासगी दूध संघांनी शेतकऱ्यांकडील दूध खरेदी दरात दोन ते तीन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दूध घेणे महागात पडू लागल्याने दूध व्यापारी संघाने दूध विक्रीत चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. याबाबत सोलापूर दूध व्यापारी संघाची बैठक मागील आठवड्यात पार पडली. त्यावेळी संघाचे अध्यक्ष दिपक सावंत, उपाध्यक्ष संतोष शहाणे, सचिव सिद्राम पेरणे, पांडूरंग बेडगे, सतीश बेडगे, गैनीनाथ पाटेकर आदी उपस्थित होते. दूध विक्रीची दरवाढ सप्टेंबर-ऑक्‍टोबरपर्यंत कायम राहणार असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. 


उन्हाळ्यात वाढू शकतो आणखी एक रुपया 
दूध संकलनात अपेक्षित वाढ झाली नसल्याने दूध खरेदीच्या दरात खासगी दूध संघांनी दोन ते तीन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे खासगी दूध विक्रीच्या दरात 1 फेब्रुवारीपासून चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सोलापूर दूध व्यापारी संघाने घेतला आहे. साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्‍टोबरपर्यंत हाच दर राहण्याची शक्‍यता असून उन्हाळ्यात दूध संकलनात आणखी घट झाल्यास एक रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. 
- संतोष शहाणे, उपाध्यक्ष, सोलापूर दूध व्यापारी संघ 


ठळक बाबी... 

  • महापुरामुळे जनावरांची संख्या कमी झाल्याने दूध संकलनात 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट 
  • खासगी दूध संघांच्या खरेदी दरात दोन ते तीन रुपयांची वाढ : विक्रीतही चार रुपयांची वाढ 
  • शहरात 45 ते 50 हजार लिटर दुधाची दररोज विक्री : पावसाळ्यापर्यंत दर राहणार जैसे थे 
  • गायीच्या प्रतिलीटर दुधासाठी मोजावे लागणार 48 रुपये तर म्हशीच्या दुधासाठी 54 रुपयांचा दर 
  • दुग्धजन्य पदार्थही महागणार : मागणीनुसार पुरवठा पडतोय कमी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com