Solapur Fraud: गृहनिर्माणची जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार; २२ जणांवर गुन्हा, शासनाची फसवणूक
Government Cheated in Housing Land Case: २५ जुलै रोजी उत्तर सोलापूर दुय्यम निबंधक कार्यालयात संस्थेच्या जागेची खरेदी-विक्री झाली. संस्थेच्या भोसले येथील मूळ गट क्रमांक ६४ मधील एक हेक्टर ९० आर क्षेत्र असलेल्या जागेतील प्लॉट क्रमांक ६४/१/३८ हा रस्ता आणि खुले क्षेत्र प्लॉटधारकांसाठी राखून ठेवले होते.
22 accused in housing land scam; ₹27 lakh misappropriated by selling government-allotted plot.Sakal
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी सहकारी संस्थेच्या भोसरे (ता. माढा) येथील जागेतील रस्ता व खुली अशी एकूण १.४२ एकर जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्षांसह २२ जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.