

Chandrabhaga Water Project Transformed Farming Economy in Solapur District
sakal
सोलापूर : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि दूरदृष्टीचे नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती गुरुवारी (ता. १२) राज्यभर साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही लोकांच्या जीवनाशी घट्ट जोडलेले आहेत. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरलेला प्रकल्प म्हणजे उजनी धरण. चंद्रभागा नदीचे पाणी अडवून त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला प्रवाहित केले.