

Public Facility Protest in Modnimb Ends as Assurances Given to Activist
Sakal
मोडनिंब : मोडनिंब बसस्थानकातील प्रवाशांच्या गैरसोई दूर करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या होत्या. मागण्यांकडे राज्य परिवहन विभागाकडून दुर्लक्ष केल्याने मोडनिंब येथील प्रदीप गिड्डे यांनी सोमवारी (ता. १) उपोषण केले होते. सायंकाळी उशिरा सोलापूर विभाग नियंत्रकांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.