esakal | बार्शीत चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

The husband has murdered his wife on suspicion of character in Barshi

बार्शी शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बार्शीत चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा खून

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : शहरातील उपळाई रस्त्यावरील शंभर फूट रोडवर राहणाऱ्या विवाहितेचा नाक-तोंड दाबून आणि  गळा आवळून पतीने तिचा खून केला आहे.  बार्शी शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

आगीमुळे पाच दुकाने भस्मसात ! पंधरा दिवसातील जळीताची दुसरी घटना
 
रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी (वय 25, रा. सांगोला) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. रुकसार मुलाणी (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिची आई जुबेदा म. हुसेन खान यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. पहिल्या पतीने सोडून दिल्यानंतर रुकसार मुलाणी ही मजुरीनिमित्त सांगोला येथील हॉटेलमध्ये कामाला असताना ट्रक चालक रिहान मुलाणी याच्याशी तिची ओळख झाली. तुझ्या दोन मुलांसह तुला सांभाळतो असे रिहान याने सांगितले व तिच्याशी विवाह केला. 

माहेरून तीन लाख रुपये आण, मला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दे म्हणून विवाहितेचा छळ

एक महिन्यापूर्वी सांगोला येथून दोघे बार्शी येथे राहण्यास आले व मुले महाबळेश्वर येथे मदरसा येथे दाखल केले असल्याचे सांगितले. 8 एप्रिल रोजी जेवणाचे कारण तसेच तू मोबाईल वापरु नको, चारित्र्यावर संशय घेऊन दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातूनच त्याने रात्री तिचा गळा आवळून, नाक तोंड दाबून खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नसून तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.