पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला झालेली जन्मठेप रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband life imprisonment canceled for wife murder Mumbai high court solapur

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला झालेली जन्मठेप रद्द

सोलापूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला पेटवून मारल्याबद्दल इक्‍बाल मेहबूब मोमीन (रा. कुमठा, ता. अक्कलकोट) यास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पण, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव व सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने ही शिक्षा रद्द करून आरोपीस निर्दोष मुक्त केले.

घटनेची हकीकत अशी, १२ मे २०१५ रोजी सायंकाळी सहा वाजता इक्‍बाल हा दारू पिऊन घरी आला. पत्नी फातिमाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुला जिवंत ठेवणार नाही, म्हणून घरातील चिमणीतील रॉकेल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. त्यानंतर उपचार सुरू असतानाच २३ मे २०१५ रोजी तिचा मृत्यू झाला. पण, फातिमाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना १३ मे २०१५ रोजी पोलिसांत फिर्याद दिली. अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा नोंद झाला. त्यावरून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तो खटला चालला. पत्नीचा खून केल्याप्रकरणात आरोपी इक्‍बाल मोमीनला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यानंतर ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत मोमीन याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. खटल्याच्या सुनावणीवेळी ॲड. थोबडे यांनी मृताच्या मृत्युपूर्व जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे तो जबाब विश्वासार्ह नसल्याचे सांगत त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मोमीनची जन्मठेपेची शिक्षा रद्द ठरवून त्याला निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲड. अमित पालकर यांनी काम पाहिले.

Web Title: Husband Life Imprisonment Canceled For Wife Murder Mumbai High Court Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top