बार्शी : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

life imprisonment
बार्शी : पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप!

बार्शी : पत्नीस ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप!

बार्शी : वैराग (ता. बार्शी) येथील शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी आलेल्या पती-पत्नीमध्ये तुम्ही दुसरे लग्न का केले या कारणावरुन भांडण होऊन पतीने पत्नीचा मध्यरात्री गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप (life imprisonment)व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधिश (judge)अजितकुमार भस्मे यांनी सुनावली. लक्ष्मण जग्गू शिंदे(वय 30रा.घाटनांदूर,ता.केज,जि.बीड)असे जन्मठेप झालेल्याचे नाव आहे वैराग पोलिस ठाण्यात सागर जाधव(रा.नाथापूर,जि.बीड)यांनी 12 जून 2018 रोजी बहिण सविता लक्ष्मण शिंदे(वय 22) हिचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा: पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये एकदाच पैसे भरा, दर महिन्याला मिळवा व्याज

लक्ष्मण शिंदे याचा विवाह झालेला असताना त्याने पहिल्या पत्नीस सोडचिठ्ठी दिली असे भासवून मुरुड येथील एका मुलीशी दुसरा विवाह केला होता दुसरे लग्न का केले म्हणून पती-पत्नी मध्ये भांडण होत असे.वैराग येथील उस्मानाबाद चौकामध्ये रस्त्यालगत असलेल्या डॉ.शिरीष भूमकर यांच्या शेतात विहीर खोदाईचे काम त्यांचेसह नातेवाईकांनी घेतले होते व शेतातच तंबू टाकून सर्वजण राहणेस होते.तुझ्यामुळे मला दुसऱ्या बायकोला सोडावे लागले माझ्या दुसऱ्या लग्नासाठी झालेला खर्च वाया गेला तू माझे पैसे दे नाहीतर बायको आणून दे या कारणावरुन 11 जून ते 12 जून 2018 दरम्यान कडाक्याचे भांडण झाले त्यावेळी आई व चुलत्यांनी भांडण सोडवले होते.

हेही वाचा: आंबिल ओढ्याच्या अतिक्रमणांमुळे पुराचा धोका

सर्वजण झोपी गेल्यानंतर 12 जून रोजी सकाळी सहाच्यापूर्वी मूल का रडत आहे पाहण्यास गेलो असता सविता हिचा गळा आवळून खून झाला असल्याचे उघडकीस आले.या खटल्यात अकरा साक्षीदार तपासण्यात आले तपास करुन तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते परिस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली सरकारतर्फे अॅड.प्रदिप बोचरे,अॅड.दिनेश देशमुख यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी अधिकारी हवालदार शशीकांत आळणे यांनी काम पाहिले.(Solapur news)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top